मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या अधीक्षक अभियंताच्या फतवा,संचालक मंडळ येण्यापूर्वीच प्रस्तावित काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरण लवकर करा!

23
0
Share:

प्रस्तावित असलेल्या काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरण.

– दाना मार्केट मध्ये 5 वर्षांपासून गटारांची साफसफाई नसल्याने गटारून निघाला एक डंपर माती.

-बाजार आवारात साफसफाई कागदावर होतात.

नवी मुंबई:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधीक्षक अभियंताचा फतवा,संचालक मंडळ येणाऱ्या अगोदर शिलक असलेल्या प्रस्तावित काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरण लवकर करा या फतवा काढल्यामुळे दाना मार्केटमध्ये काम पाहणाऱ्या मार्केट अभियंता यांनी कंत्राटदारना हातात धरून शिलक असलेल्या काम लवकर करायला सुरुवात केली आहे असे चित्र शनिवारी दाना मार्केट मध्ये j आणि m च्या मधील रस्त्यावर दिसुन आला .

शनिवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक होता या निवडणुकीत सहा महसूल विभागवमधून 12 शेतकरी प्रतिनिधी व 4 बाजार प्रतिनिधी निवडून येणार आहेत ज्याची निकाल सोमवारी (दि.2) मतमोजणी होणार आहे त्यामुळे शिलक असलेल्या काम लवकर पूर्ण करा नाहीतर संचालक मंडळ येऊन त्रास देणार आहे अशी फतवा बाजार समितीच्या अधीक्षक अभियंता यांनी काढला आहे,या अगोदर प्रवेश द्वार,व्यापार भवन समोर काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आला आहे.तसेच टेंडर मध्ये असलेल्या पेवरब्लॉक आणि लावण्यात आलेल्या पेवरब्लॉक मध्ये खूप फरक आहे अत्यन्त निकृष्टदर्जेच्या पेवरब्लॉक लावण्यात आली आहे.सध्या काही दिवसात नवीन संचालक मंडळ येणार आहे झालेल्या कामवर काय कारवाई करणार अशी चर्चा बाजार आवारात सुरू आहे .


मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीकडून दाना व मसाला मार्केट बाजारामध्ये काँक्रीटकरण, डांबरीकरण आणि गटाराच्या कामासाठी मंजुरी मिळाली असताना दाना मार्केट येथील व्यापारी भवन आणि जे ,एम विभागातील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच फुटपाथवर पेवरब्लॉक च्या काम सुरू आहे ते पण निकृष्ट दर्जाची आहेत ,टेंडर मध्ये जे आहेत ते काम होत नाही अशी प्रतिक्रिया दाना मार्केट मध्ये काही व्यापारी शनिवारी निवडणूक दरम्यान दिली . बाजारसमितीचे अधीक्षक अभियंता व मार्केट अभियंता डोळेझाक करत आहे त्यामुळे रस्त्याची उंची वाढुन कामगारांना मालाची चढ-उतार करताना त्रास होतो आहे .टक्केवारी साठी हा अजब कारभार चालू असून या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काही व्यापारी करत आहे.कामाच्या दर्जाविषयी ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती येथील दाना मार्केट व मसाला मार्केटमध्ये काँक्रीट,डांबरीकरण व गटाराच्या कामासाठी बाजारसमितीकडून मंजुरी मिळाली आहे.या कामासाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.दोन्ही मार्केटच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणा ची कामे बी.जे सिव्हिल वर्क या कंत्राटदाराला देण्यात आली आहे.दाना मार्केट व मसाला मार्केट येथे अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे डांबरीकरण केलेले रस्ते लवकर खराब होतात.याशिवाय येथील गटारांची अवस्थाही वाईट आहे गटार पाच वर्षापासून साफ ना केल्याने गतरातून माती मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे कोट्यवधी रुपये खर्चाकरून पावसा आधी गटारांची साफ सफाई केला जातो पण ते फक्त दिखावा आहेत असे चित्र दिसून आले आहेत . म्हणून व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन या कामाची मागणी केली होती.येथील प्रस्तावित ठिकाणी काम केले जात नसून व्यापारी भवन येथील चार वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरच हे डांबरीकरण केले जात असल्याचे जे ब्लॉक मधील काही व्यापाऱ्याने सांगितले.

चालू असलेले काम खोदकाम नकरताच डांबरीकरण केले जात आहे या डांबरीकरणामूळे रस्त्यांची उंची वाढली आहे त्यामुळे माथाडी कामगारांना मालाची चढ-उतार करताना त्रास होत आहे.ड्रेनेजचे काम पाहिजे त्या पद्धतीने केले नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या डांबरीकरण चालू असलेल्या डांबराची जाडी देखील कमी आहे.हे काम पूर्ण होण्याचा अवधी पूर्ण होण्यास अवघे काही महिने बाकी असूनही 40 टक्के कामच झाले आहे .इतर काम असताना डांबरीकरण आणि पेवरब्लॉकच्या काम जोरात सुरू केलेले आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Share: