एफडीए ची कारवाई मुंबईतील 27 हॉटेलांचे परवाने रद्द

4
0
Share:

हॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, कच्चा माल, तसेच तयार होणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता अशा विविध पातळ्यांवर अन्न व औषध प्रशासनतर्फे तपासणी करून राज्यभर कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईअंतर्गत मुंबईतील २७ हॉटेल्सनाएफडीएने नोटीस पाठविली. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेले निकषांचे पालन न केल्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले.पंचतारांकित हॉटेलमधील अन्नाचा दर्जा कसा असावा, अन्न शिजविताना कोणते निकष पाळावेत, याची नियमावली प्रशासनाने दिली आहे. यात कच्चा माल साठवण्याची पद्धत, तेल-तूप आणि जिन्नसाची कालमर्यादा, स्वयंपाकघर स्वच्छता अशा अनेक घटकांचा समावेश आहे. वेळोवेळी हॉटेल्सना या संदर्भात निर्देश देऊनही सुधारणा न झाल्याने एफडीए नोटीस पाठवते.

Share: