मुंबई Apmc चे कार्यकारी अभियंता कोणासाठी काम करते व्यपाऱ्या साठी या कंत्राटदार साठी?बहुउदेशीय प्रश्नावरून शशिकांत शिंदे यांचा सवाल.

21
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून कोणत्याही प्रकारचे नियोजन बांधकामावेळी करण्यात आले नसल्याने बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारासह इतर जबाबदार व्यक्तींना मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक व आमदार शशिकांत शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत.

व्यापारासाठी फळ मार्केटमध्ये बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि व्यापाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याची बातमी एपीएमसी न्युजने दाखवल्यानंतर  मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक,आमदार शशिकांत शिंदे,एपीएमसी सचिव अनिल चव्हाण,अतिरिक्त सचिव संदीप देशमुख यांनी पाहणी दौरा केले होते.

व्यापाऱ्यासाठी मुंबई एपीएमसी मधील फळबाजारात उभारल्या जात असलेल्या बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामावर येथील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला होते. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे. त्यामुळे या इमारतीला नवी मुंबई महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांनी नवी मुंबई पालिका आयुक्त आणि नगररचना विभागाकडे केली आहे. सभापती अशोक डक व  आमदार शशिकांत शिंदे यांनी संपूर्ण इमारतीचे पाहणी केली असून या इमारतीच्या बेसमेंटमध्ये व्यापाऱ्यांसाठी ओपेनशेड बनवण्यात आल्या आहेत. परंतु या ओपेनशेडमध्ये पावसाळ्यात पाणी साचले जाते त्यामळे त्याचा काही फायदा नसून या इमारतीत कोणत्याही प्रकारचा व्यापार होऊच शकत नाही असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

या इमारतीत व्यापार करण्यासाठी बांधण्यात आलेले गाळे व वाहनांची पार्किंग ज्या ठिकाणी केली जाते त्या दोन्ही ठिकाणांची उंची ही हे अतिशय कमी आहे. तसेच माथाडी कामगारांना मालाची ने-आण करण्या इतपत जागा देखील या गाळ्यांमध्ये नाही. त्यामुळे येथील व्यापारी त्रस्त आहेत. २०१२ रोजी या इमारतीच्या बांधकामाची परवानगी देण्यात आली होती. हे बांधकाम २ वर्षांत पूर्ण करावे असेही सांगण्यात आले होते. तसेच इमारतीच्या बांधकामासाठी २० कोटी ८३ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. G+३ असे बांधकाम परवानगी असतानाही गेल्या ८ वर्षांमध्ये ही इमारत तब्बल ५ ते ६ वेळा तोडण्यात आली असून आणखी ९० गळ्यांचे वाढीव काम करण्यात आले असून आणखी २७ कोटींची भर या कामात घालण्यात आली असून आतापर्यंत जवळपास ५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

तळमजल्यावरील रचनेमुळे माल आत नेण्यासाठी आणि बाहेर काढताना जागेची अडचण येणार आहे. त्यामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाच्या गाड्या रिकाम्या करताना खूप वेळ लागणार आहे. तसेच, वाहतूककोंडी होऊन वाहतूक व्यवस्थाही कोलमडणार आहे. त्यामुळे जास्त वेळ गाडीत राहून आलेली फळे गाडीतच खराब होण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा खुल्या शेडमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. पहिल्या मजल्यावरील गाळ्यांची उंचीही कमी आहे आणि रचनाही योग्य नसल्याने तिथे माल उचलण्यात आणि उतरवण्यातही अडचणी येण्याची शक्यता आहे.

तसेच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बांधण्यात आलेल्या या इमारतीत कोणत्याच प्रकारचा व्यापार होऊ शकत नाही असा व्यापाऱ्यांचा आरोप असल्याने. आमदार शशिकांत शिंदे यांनी ही इमारत स्थलांतरित करून या ठिकाणी पार्किंग बनवावी व व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्येचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Share: