मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला !

29
0
Share:

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला !

नवी मुंबई:सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी (दि . २ ) मतमोजणी कांदा-बटाटा बाजाराच्या आवारात लिलावगृहात होणार आहे . या साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे . ६ महसूल विभागात ५८ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले असून सोमवार २ मार्च मतमोजणी दिवशी कोणाच्या पारड्यात मतडं झाले आहे हे स्पष्ट होणार आहे या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे .

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला*

या निवडणुकीत माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर सह माजी संचालक शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, कीर्ती राणा या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात चार उमेदवार उभे असून, माजी संचालक शंकर पिंगळें व के डी मोरे यांच्यात चुरशीची लढत आहे. तर मसाला बाजारात माजी संचालक कीर्ती राणा व अशोक राणावत यांच्यात चुरस आहे. तसेच दाना मार्केट मध्ये पोपटलाल भंडारी व निलेश वीरा यांच्यात चुरशीची लढत आहे. कांदा मार्केट मध्ये अशोक वाळुंज व कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके याच्या लढत आहेत या सर्वच उमेदवारांच्या भविष्यावर बाजारक्षेत्रात असलेले सर्व दिग्गजांचेच नजर लागली आहे.
*१० मतदार संघाची निवडणूक*

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६ महसुल व ४ व्यापारीसंघासह एकूण १० मतदारसंघाची निवडणूक शनीवारी पार पडली. या निवडणूकीत एकूण ५८ उमेदवार रींगणात आहे. शनिवारी झालेल्या या निवडणूकित एकूण ९३.७२ टक्के मतदान झाले आहे. त्यातील ६ महसूल विभातात एकूण ३९२८ मतदार पैकी ३८७८ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीपेक्षा सर्वात जास्त आहे. यामुळे माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे .
*या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग*

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यसत्तेप्रमाणे या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग आजमावला गेला असून, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप व शिवसेना यांनी आपले पॅनल बनविले आहे. भाजपही या निवडणुकीत सहभागी झाले आहे. मात्र पाचही बाजारातील व्यापारी प्रतिनिधी कोणत्याही पॅनल मध्ये सहभागी झाले नसल्याने दिसून येत आहे.

Share: