राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर

19
0
Share:

-राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर

-फळपिकांना १८००० रुपये हेक्टरी मदत तर खरीप पिकाला ८००० रुपये हेक्टरी मदत जाहिर

-दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत

-परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णय

-अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न

मुंबई:परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीचा पहिला हात देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी  आर्थिक मदत जाहीर केली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचं नुकसान  झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी 18 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचितसह दिलासा दिला आहे.

कृषी खरीप पिकांसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 8,000 रुपये, आणि फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर 18 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, हेक्टरी 8 हजार म्हणजे एकरी 3 हजार ते 3200 रुपयेच मदत मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने विरोधकांनी त्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Share: