नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वाशीत भव्य रॅली .

17
0
Share:

नवी मुंबई-केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्षने होत आहेत. अशातच या कायद्याच्या समर्थनार्थ वाशीत भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यामध्ये शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

वाशी रेल्वेस्थानकापासून या रॅलीची सुरवात करुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाअध्यक्ष रामचंद्र घरत, सरचिटणीस सतिश निकम, माजी खासदार संजीव नाईक, कृष्णा पाटील, सी. व्ही. रेड्डी, अजय मुडपे आदी उपस्थित होते. रॅलीदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅली पोचल्यानंतर त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

Share: