किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कसा मिळेल, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात? जाणून घ्या

Share:

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना KCC च्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यावर लागणारं व्याजही गतिशील असतं. म्हणजे, जर कर्ज घेणारे शेतकरी वेळेवर कर्ज परत करतात त्यांच्याकडून कमी व्याज घेतलं जातं. शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही 1.60 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विना गॅरंटी घेऊ शकतात. या कार्डवर शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्डचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना (Interest Rate On Kisan Credit Card Loan) कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करुन देणं आहे. असंघटित क्षेत्रातून जास्त व्याजदरावर कर्ज घेण्यापासून भारतीय शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हे लाँच करण्यात आले होते. गरज पडल्यास शेतकरी बँकेतून कर्ज घेऊ शकतात. त्याशिवाय, पीक विमा आणि सिक्योरिटी मुक्त विमा देखील उपयोगकर्त्यांना मिळू शकेल. कमी व्याजदरावर कर्ज मिळवण्यासाठी देशातील कोट्यावधी शेतकरी या कार्डचा वापर करत आहेत.

जर कर्जाची परतफेड निश्चित कालावधीनंतर करण्यात आली तर शेतकऱ्यांना सात टक्के व्याज द्यावंच लागेल. जर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वाचवायचे असेल तर किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय पीक विमा योजनेत केसीसीसाठी पात्र असलेल्या पिकांना कव्हर करते.
या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचं शॉर्ट टर्म कर्ज घेतलं जाऊ शकतं. या कार्डचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्डवर घेतलेलं कर्ज स्वस्त व्याज दरावर उपलब्ध होतं. पिकासाठी घेतलं जाणारं कर्जावर सात टक्के व्याज आकारलं जातं. पण, कर्ज फेडताना शेतकऱ्यांना सरकार तीन टक्क्यांची सब्सिडीही देते. त्यामुळे स्वस्त व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना तेव्हाच होईल जेव्हा ते वेळेवर कर्ज फेडतील.

 

Share: