मी ऐरोली मतदार संघातून नक्कीच विजयी होईन-गणेश नाईक

22
0
Share:

*मी ऐरोली मतदार संघातून नक्कीच विजयी होईन-गणेश नाईक*

नवी मुंबई: आज ऐरिली मतदार संघातील महाआघाडी व युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. मी ऐरोली मतदार संघातून नक्कीच विजयी होईन असे यावेळी गणेश नाईक यांनी म्हंटले.


गणेश नाईक यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर बेलापूर मतरदार संघातून युतीच्या मंदा म्हात्रे की गणेश नाईक? ही चढाओढ सुरू असताना बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली व संदीप नाईक यांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र सर्वानुमते माघार घेतली व गणेश नाईक यांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी मिळाली आज गणेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरला त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून माथाडी नेते गणेश शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
जनतेच्या आशिर्वादाने मी ऐरोली मतदान संघातून विजयी होईन असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. निवडून आल्यावर स्थानिक प्रकल्पग्रस्त यांची घरे, सिडकोच्या माध्यमातून बांधलेल्या इमारती तसेच झोपडपट्टीवासींना चांगली घरे यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.तरूणांना रोजगार नोकऱ्या याकडेही लक्ष पुरविण्यात येईल असे नाईक यांनी म्हंटले

Share: