मास्क न लावता दिवाळीची खरेदी करताय तर सावधान!, हे पथकं ठेवतंय तुमच्यावर नजर

19
0
Share:
नवी मुंबई: जगावर अजूनही कोरोनाचे सावट आहे. कोरोना काळात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याचे तसेच पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उचलण्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांसह नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांनी एक नवे पथक तयार केले आहे. ज्यात मुख्य केंद्र हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज करोडोची उलाढाल होत असून हजारो लाखो लोकांची ये- जा असते. तसेच त्यात बरीच लोकं हे कोरोनासंदर्भातली जी काळजी घ्यायची आहे ती घेत नाहीत. परिणामी कोरोना संकट अधिक बालवण्याची शक्यता आहे.
जवळपास ७ ते ८ महिने संपूर्ण देशात लॉकडाऊन होते, हळू हळू सर्वत्र लॉकडाऊन शिथिल होत गेले. त्यातच दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता दिवाळीची खरेदी करण्यासाठी सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. गर्दीच्या ठिकाणी बरीचशी लोकं ही मास्क वापरात नसून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आले. तसेच वाढत्या गर्दीत कोरोना आणखी बळावू शकतो.
कोरोनाचे  संकट रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांनी एक नवे पथक तयार केले आहे. यासाठी महानगरपालिकेकडून ८ पथकं तयार करण्यात आलेली आहेत. ही पथकं नवी मुंबईतील ८ विभागांमध्ये स्वंत्रतत्ररित्या फिरून पाहणी करणार असून ज्यांनी मास्क लावलेला नसेल त्यांच्यावर कारवाई करणार असून महापालिकेकडून एक अधिकारी व एक कर्मचारी असून नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाकडून दोन कर्मचारी देण्यात आले असून मास्क न लावणाऱ्यांवर हे पथकं कारवाई करणार आहे. तसेच कारवाईसह हे पथकं नागरिकांना प्रबोधनदेखील करणार असून दिवाळीच्या सणापर्यंत हि कारवाई चालू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
Share: