मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये ‘ शेतकरी भोजन’ फक्त 40 रुपयांत

52
0
Share:
नवी मुंबई: महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठ म्हणजे एपीमसी मार्केट. या मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी शेतमाल विकण्यासाठी याठिकाणी येतात. त्यांच्यासोबत वाहनचालक देखील येथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अश्या हजारो लोकांसाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या,धर्मवीर संभाजी राजे भाजीपाला संकुलात ,रिपब्लिकन बहुजन सेना या पक्षाच्या माध्यमातून बाजार आवारातील जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी व शेतमालाच्या वाहनधारकांकरिता फक्त 40 रुपयात ‘शेतकरी भोजन’ आयोजित केले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांच्या हस्ते हे उदघाटन पार पाडण्यात आले.घाटे यांनी सांगितले की
मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी उपहारगृहे चालू आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जाते. या उपहारगृहांमध्ये एका थाळीची किंमत 100 ते 150 रुपये आकारली जाते, तसेच पूरी भाजीसाठी 70 रुपये आकारले जातात. शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या किमतीत येते उपहारगृहे चालवली जात आहेत.
रिपब्लिकन बहुजन सेना या पकशातर्फे शेतकऱ्यांना परवडेल अश्या अल्प किंमतीत शेतकरी भोजन आज पासून चालू करण्यात आले आहे. यामध्ये पुरी, 2 प्रकारच्या भाज्या, शिरा, भात, पापड फक्त 40 रुपयात हे पोटभर जेवण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच जेवणा सोबत बाजारात मिळणाऱ्या  20 रुपये बिसलेरी पाणी 10 रुपये मध्ये देण्यात येबर आहे .आज गांधी जयंतीनिमित्त 500 जणांना जेवणाची वाटप करण्यात आला आहे.
गेल्या 7 ते 8 महिन्यांत कोरोनामुळे लोकांची भूकमारी झाली आहे. लोकं उपाशी मरू नयेत यासाठी हा शेतकरी भोजनाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
Share: