नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 74 कोरोना पॉझिटिव्ह 5 नवीन कोरोना रुग्ण आढळले

18
0
Share:
 नवी मुंबई:  नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.आतापर्यंत नवी मुंबईत 74 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली असून, आज 5 नवीन रुग्ण आढळले आहेत.
नवी मुंबईत आतापर्यंत 1206 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली  आहे. यामध्ये 903 व्यक्तींचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.आत्ता पर्यत नवी मुंबईत 74 जणांना कोरोनाची लागणं झाली असून, आज पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. व 23 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.व 229  जणांचे कोविड 19चे अहवाल येणे प्रलंबित आहे. 17 एप्रिलला दिवागाव ऐरोली येथील तीन जणांना कोरोनाची लागणं झाली होती, त्यातील एका व्यक्तीच्या पत्नीला (43)व मुलाला(22) तसेच जवळच्या संपर्कातील व्यक्तीला कोरोनाची लागणं झाली असल्याचे आज अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच करावे गाव येथील मुंबई शिवडी येथे वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या 36 वर्षीय व्यक्तिचेही  कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच घणसोली येथील 36 वर्षीय तरुणांचे देखील कोरोनाचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून, या सर्वांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे माहिती  नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अणासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.

Share: