धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन

18
0
Share:

धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन*

मुंबई: आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरिप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतक-यांना प्रोत्साहनपर प्रति क्विटल सातशे रुपये (Paddy Procurement Incentive Support) देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे 1400 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल.

खरीप हंगाम 2020-21 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी 1868 रुपये व ग्रेड धानासाठी 1888 रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीचही राशी मिळेल.या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.

Share: