टोमॅटोच्या दरात वाढ

18
0
Share:

नवी मुंबई : गेल्या आठवड्या पर्यंत घाऊक बाजारात १८ ते २० रु किलो असणारा टोमॅटो आज घाऊक बाजारात ३६ ते ४४ रु किलो पर्यंत गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो ६० रु किलो पर्यंत गेला आहे. कांद्याची साठी झाल्या नंतर आता टोमॅटो हि साठ रु किलो च्या घरात पोहचला असल्याने आत्ता हे भाजी पाल्याचे दर कधी सुरळीत होणार असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

वाशीतील घाऊक बाजारात सातारा सांगली बरोबरच बेंगलोर मधून हि टोमॅटोची आवक होते. सध्या बाजारात टोमॅटोचे ४० ते ४५ ट्रक बाजारात येत आहेत. त्यात तीन ते साडे तीन हजार क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे मात्र हि आवक मागणी साठी पुरेशी नाहीय त्यामुले टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात बंगलोर च्या टोमॅटोची आवक जास्त होत आहे. हे टोमॅटो गुणवत्तेत अधिक चांगले असल्याने त्यांचे दर नेहमी इतर ठिकाणच्या टोमॅटो पेक्षा वाढीव असतात. टोमॅटो प्युरी करण्यासाठी त्यांचा अधिक वापर होतो. आणि त्यांचे दर अधिक असतात .आत्ता घाऊक बाजारातच हे टोमॅटो ३६ ते ४४ रु किलो झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात हे टोमॅटो ६० रु किलो ने विकले जात आहेत.

 

 

Share: