पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात नाहीच, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कांगावा

6
0
Share:

एकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे.एकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असू शकत नाही, अशी ओरड सुरू केली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे अशी विचारणा झाली असता जैश ए मोहम्मदने हे कृत्य केलेले नाही, असा दावा केला. “पुलवामा हल्ल्याबाबत आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.” असे शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले. मात्र जैशशी कुणी संपर्क साधला होता, हे सांगण्यास मात्र त्यां

Share: