केजरीवालांनी ‘करून दाखवलं’, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार ‘दिल्ली सरकार’

6
0
Share:

राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेती मालाला भाव देणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली सरकार घेईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून गहू या पिकासाठी 2616 रुपये तर धान्यासाठी 2667 रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी लागूकरणार असल्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले आहे. तसेच याबाबत जनेतेच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल, असेही केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलेआहे.

Share: