एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांवर चाकू हल्ला

22
0
Share:

नवी मुंबई:
एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये भर दिवसात व्यापाऱ्यांवर चाकू हालाची धक्कादायक घटना समोर आली आहे,सदर ही प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे,आरोपीला येथील जमावने मारहाणं करून पोलिसांचा ताब्यात दिली आहे
येथील  डी विंग मध्ये गाला नंबर 408 मध्ये बुधवारी सकाळी व्यापारी राकेश यादव वर आरोपी मंगल पांडे यांनी धाडसी चाकू हल्ला केला या वेळी व्यापारी राकेश यादव यांच्य गळ्यावर वार केले या घटने नंतर आरोपीने तब्बल दहा मिनिटे आपली दहशत माजवली होती आणि कोणाला जवळ येऊ दिले नाही हा सगळा प्रकार मार्केट येथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे अखेर येथील जमावाने आरोपीला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांचा ताब्यात दिले आणि व्यापारी ला मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे,ह्या हल्ला मागचे करण अद्याप समजले नाही अधिक तपास एपीएमसी पोलीस करत आहे

Share: