कोकणी मेव्याला आलाय बदामाचा भाव, शेतकर्‍यांमध्ये समाधान काजू पिक कमी असलं तरी चांगले पैसे मिळवून देणार..

7
0
Share:

नवी मुंबई : बदललेल्या हवामानाचा फटका यावर्षी आंब्यासह काजू उत्पादनाला बसला आहे. यावेळी लांबलेल्या पावसमूळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतातुर झालेत. त्यातच तब्बल सव्वा महिना उशीराने रत्नागिरीच्या बाजारपेठेत ओले काजूगर दाखल झालेत. यावर्षी काजूचे उत्पादन लांबल्याने कोकणातील ओल्या काजूगराला यावर्षी चांगला भाव आला आहे. यावर्षीही काजू पिक कमी असलं तरी चांगले पैसे मिळवून देणारं चित्र असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

कोकणी मेवा असणाऱ्या ओल्या काजुगराला सध्या बदामाचा भाव आला आहे आणि याला कारण देखील तसंच आहे. यावर्षी ओल्या काजुगराचे दर गगनाला भिडले आहेत. जर तुम्ही काजूगर खरेदीला गेलात तर प्रतिकिलोमागे तुम्हाला 2500 रुपये मोजावे लागणार आहेत. तर किरकोळ बाजारात ओले काजूगर हे 20 रूपयांना तीन नग अशी विक्री केली जात आहे. कोकणात आलेली वादळं, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे यंदा काजू मोहोरलाच नाही. त्यामुळे यंदा काजूचं उत्पादन कमालीचं घटणार आहे. यावर्षीही काजू पिक कमी असलं तरी चांगले पैसे मिळवून देणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Share: