लिंबू 1 रुपया किलो, लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

चाळीसगाव :- करोनाच्या सावटा असलेल्या सामान्य जनतेला स्वस्त झालेल्या लिंबूने काहीसा दिलासा दिला आहे.करोना आजारावर गरम लिंबू पाणी प्रभावी उपचार ठरते त्यांने त्याचा ऊपयोग मोठ्या प्रमाणावर होत असून शेतकऱ्याचं मात्र भाव गडगडल्याने कंबरड मोडल आहे.
शेत मशागत उत्पन्नावर लागणारा खर्च सोडा बाजारात भाड्याची गाडी लावून लिंबु विक्रीसाठी आणणे देखील शेतकऱ्यांना परवडत नसल्याने अनेकांनी लिंबु जागेवरच फेकून देणे पसंत केले आहे असून लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.
आज घाऊक बाजारात लिंबू 1 रुपये किलो विकला गेला.तर किरकोळ विक्री 5 रुपये किलो राहिली,आवक अधिक आणि खप कमी असल्याने लिंबुचे दर घसरल्याची माहिती व्यापारी चंद्रकांत महाले यांनी दिली.
चाळीसगाव तालुका परिसरात वाडे ,गुढे ,बहाळ, वाघले, हातले परिसरात मोठया प्रमाणावर लिंबूच्या बागा आहेत.मुंबई, नाशिक ,
गुजरात राज्यातील सुरत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लिंबू निर्यात होतो.,तिकडे देखील दर कमी झाल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक संकटात सापडला आहे