Lockdown 5.0: प्रवासासाठी परवानगीची गरज नाही,लोकडाऊन 5 चे नियम जाणून घ्या

25
0
Share:

 

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. (Lockdown Extention )

या गाईडलाईननुसार कंटेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र सरकार शिथीलता देण्यात आली. येत्या १ जूनपासून ३० जूनपर्यंत या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये (Lockdown 5.0 Rules Regulation) अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?

1.कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार

2. कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन

3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार

4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार

5. रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी

6. राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही

7. कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही

8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार

9.प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार

10.प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू

11.शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय

12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार
देशातील प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन कायम राहणार आहे. तसेच हा लॉकडाऊन आणखी कठोर होणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाबतचे निर्णय संबंधित राज्य ठरवणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे.

कन्टेनमेंट झोनबाहेरील गोष्टी तीन टप्प्यात खुल्या होणार

पहिला टप्पा

धार्मिक स्थळं, सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवांसह शॉपिंग मॉल 8 जूनपासून खुले होणार.

दुसरा टप्पा

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था राज्य सरकारांशी चर्चा करुन जुलै 2020 मध्ये खुले करता येणार आहेत. राज्य सरकार यावर निर्णय घेण्यासाठी संस्था आणि पालकांशी देखील चर्चा करु शकेल.
तिसरा टप्पा
गृहमंत्रालयाने निश्चित केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो रेल्वे, सिनेमागृहं, व्यायामशाळा, स्विमिंगपूल, बार आणि इतर तत्सम ठिकाणं खुली करण्याविषयी तिसऱ्या टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. याच्या तारखा परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर घोषित केल्या जातील.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे
चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे
पाचवा लॉकडाऊन – 1 जून ते 30 जून
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

पहिली बैठक – 20 मार्च
दुसरी बैठक – 2 एप्रिल
दुसरी बैठक – 11 एप्रिल
तिसरी बैठक – 27 एप्रिल
पाचवी बैठक – 11 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला.

Share: