भाजीपाला बाजारात मद्रासी काकडीचा हंगाम सुरू,बाजारात आवक वाढली

9
0
Share:

नवी मुंबई: मद्रासी काकडी थंडी च्या हंगामात येते.त्यामुळे सध्या बाजारात मद्रासी काकडीची आवक वाढली आहे.सांबार बनविण्यासाठी मद्रासी काकडीची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.त्यामुळे या काकडीला मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे.

काकडी हे पित्तशामक फळ आहे.सध्या मद्रासी काकडी किंवा मंगलोरी काकडी चा हंगाम सुरू झाला आहे.थंडीच्या कालावधीत ही काकडी मोठ्या प्रमाणात येते.
दक्षिण भारतात सांबार हा खाद्यपदार्थाचा समावेश आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो.या पदार्थासाठी मद्रासी काकडी उत्तम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.या काकडी चा समावेश डोसा बनविण्यासाठी ही केला जातो.त्यामुळे हॉटेलचालकांची ही या काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.सध्या बंगलोरवरून या काकडीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.रोज ४ ट्रक ची आवक होत आहे.ही काकडी बाजारात प्रति किलो १२ रु या घाऊक दरात उपलब्ध आहे.किरकोळ बाजारात या काकडीचे दर प्रति किलो ३०रु आहे,असे  व्यापाऱ्याने सांगितले.

Share: