Maharashtra Flood: सीबीडी बेलापूरमधून 13 हजार लिटर पिण्याची पाणी पुरग्रस्तांसाठी कोल्हापूर व सांगलीला रवाना

4
0
Share:

नवी मुंबई:कोल्हापुर, सांगलीमध्ये आलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या मदतीसाठी सीबीडी बेलापूर येथे हिलटन सेंटर मध्ये असलेल्या सदनिका धारकांनी (12ऑगस्ट) रोजी मदतीसाठी गोळा केलेली 13 हजार लिटर पाण्याची बॉटल दोन ट्रकद्वारे बेलापूरमधून कोल्हापूर व सांगलीला रवाना करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात लोकांनी सुमारे 13 हजार लिटर पिण्याच्या पाणी गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. सोमवारी रात्री दहाची हे साहित्य दोन ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहे. यावेळी नवी मुंबई पोलीस उपायुक्त पंकज दाहणे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर,एपीएमसी पोलिश ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम ,हिलटन सेंटरचे सगळे सदनिका धारक यावेळी उपस्थित होते.

Share: