मुंबई APMC मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मापाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून पगार नाही; 4 कोटी 24 लाख थकबाकी

7
0
Share:

मुंबई APMC मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मापाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून पगार नाही; 4 कोटी 24 लाख थकबाकी

आमदार शशिकांत शिंदे यांनी एपीएमसी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला अल्टीमेंटम…

1 तारखेपर्यंत 100 टक्के बाजार फी वसुली करा नाही तर सस्पेंडसाठी तयार राहा..

-मुंबई APMC मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मापाडी कामगार व शेतकरी कंगाल तर एपीएमसी कर्मचारी व व्यापारी मालामाल


नवी मुंबई:अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई कृषी उपन्न बाजार समितीमध्ये कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या मापाडी कामगारांना पगार न मिळाल्यामुळे आज( 9 सप्टेंबर) रोजी आमदार शशिकांत शिंदे यांनी 357 कामगारांना सोबत घेऊन भाजीपाला घाऊक बाजाराच्या आवक गेटमधून कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. बाजार समितीची वसुली 100 टक्के आणि मापड्याची वसुली 100 टक्के झाली पाहिजे जे व्यापारी वसुली देणार नाहीत त्याचं लायसन रद्द करा असा अल्टीमेंटम यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजीपाला मार्केटच्या सहायक सचिव यांना दिला आहे त्याच बरोबर आवक गेटच्या कर्मचारी व मार्केट निरीक्षकांची चांगलीच शाळा घेतली.
कोरोना काळात दिवसरात्र कांदा बटाटा, फळ मार्केट, भाजीपाला आवारात गेली अनेक वर्षांपासून तोलाईची कामे करणाऱ्या 357 मापाडी कर्मचाऱ्यांना 4 करोड 24 लाख थकीत तोलाईची रक्कम अजून देण्यात आलेली नाही . कोरोनाकाळत मुंबई एपीमसी बाजारात आवारात मोठ्या प्रमाणात गाड्याची आवक जावक होत आहे तरी सुद्धा दिवसरात्र कामकरून पण आम्हाला 3 महिन्यापासून पगार देण्यात आला नाही यामध्ये यामुळे आमच्या परिवाराची आर्थिक स्थिती बिघडली आहे अशी प्रतिक्रिया काही मापाडी कामगार यांनी दिली आहे .हळू हळू बाजार संपत चालली आहे बाजार टीकायच असेल तर बाजार आवारात येणाऱ्या गडायच महसूल वसुली करा आणि चांगले पद्धतीने काम करा यावेळी सेवा देणाऱ्या कामगारांना पगार समय पर द्या ,या कामगारांसाठी वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा या लोकांना आवक देण्यात आली नाही 1 ऑक्टोबर पर्यन्त 100 टक्के बाजार फी वसुली करून या कामगारांना पगार द्या नाही तर जे काही दोषी असतील त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिले.
प्रत्येक मार्केट निरीक्षकाची जबाबदारी असते मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाड्याची आवक जावक यांची नोंद ठेवणे परंतु, ती नोंद ठेवली गेली नाही. यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे.

मार्केटमध्ये गाड्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन सुद्धा मापाडी कर्मचाऱ्यांचा 3 महिने पगार दिला गेला नाही. आणि मार्केटचा महसूल देखील वसूल केला गेला नाही. मार्केट निरीक्षक आणि कर्मचारी यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे असा आरोप मापाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Share: