मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट मध्ये असलेल्या निर्यात भवन राम भरोसे

43
0
Share:

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट मध्ये असलेल्या निर्यात भवन राम भरोसे

भाजीपाला मार्केट मध्ये असलेल्या निर्यात भवनाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तुम्हाला बाहेरून हे निर्यात भवन अत्यंत सुंदर दिसेल मात्र तुम्ही जर निर्यात भवनाच्या आत मध्ये गेलात तर ते तुम्हाला नक्कीच हे दृशय पाहून असे वाटेल की तुम्ही एक्स्पोर्ट हाऊस मध्ये नाही तर तुम्ही कुठल्या तरी फेरीवाला झोन मध्ये आले आहेत , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेल्या ह्या निर्यात भवन मधून परदेशात भाजीपाला पॅकिंग होऊन जातो तुम्ही जर इकडची परिस्थिती पाहिलं तर तुम्हाला वाटणार की तुम्ही निर्यात भवन नाही कुठल्या भाजीपाला झोन मध्ये आलेले आहेत ,ग्राउंड आणि दोन मजल्याच्या ह्या भवन मध्ये 76 निर्यात गाळे आहेत त्याच्या व्यतिरिक्त दोन पतपेढि बँक आणि हॉटेल आहेत,या भवनात 3 हजार मजुर राहतात मात्र या मजूर लोकांची सुद्धा अत्यंत बिकट परिस्थिती आहे अंघोळीसाठी वापरत असलेल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करावा लागत आहे काही मजूर लोकांना तर विकत पाणी घ्यावे लागत आहे काही ठिकाणी तर बाथरूममध्ये पाणी सुद्धा नाही अशी जर या मजुरांची अवस्था असेल तर मग हे निर्यात भवन कसे असेल, एक्सपोर्टेर शेष भरणाऱ्या लोकांची संख्या कमी तसेच निर्यात भवनाच्या,स्वच्छतेच्या नावाखाली कोटीने पैसा जमा केला जातो मग तो पैसा कोणाच्या खिशात जातो

-भाजीपाला निर्यात भवनात दुसऱ्या मजल्यामध्ये 30 गाळे असून या गळ्यांमध्ये मध्ये ओसी नसल्याने ते अनधिकृत पणे चालतात त्याच बरोबर तळ मजल्याच्या पार्किंगच्या जागा पणन ला दिल्या त्यामुळे इथे वाहतूक कोंडी होते ,अनधिकृत पणे चालणाऱ्या ह्या भवन मध्ये उद्या जर काही अपरिचित घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोनाची
निर्यात भवनाच्या पॅसेज मध्ये पॅकिंग होते त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्याला त्रास सहन करावा लागतो यावरून तर असे दिसून येते की बाजार समितीच्या अधीक्षक अभियंत्यांनी अजब गजब कारभार चालवला आहे

Share: