मुंबई एपीएमसी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार-संजय जगताप

22
0
Share:
नवी मुंबई:मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या संचालक  पदासाठी २९ फेब्रुवारी ला मतदान होत आहे. या साठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस होता त्यामुले आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आत्ता सर्वाना मतदानाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी हि सज्ज्य झाले असून निवडणुकीची सर्व तयारी त्यांच्या कडून पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आता कांदा बटाटा बाजारात तीन उमेदवार ,भाजीपाला बाजारात ४ ,अन्न धन्य बाजारात ३ ,मसाला बाजारात ३ उमेदवारात लढत आहे. या सर्वांचा प्रचार जोरात सुरु होता, आज सकाळी अनेक तंगड्या उमेदवारांनी बाजारात प्रचार फेरी काढून आपल्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले .या प्रचार फेरी मध्ये अनेक नेते मंडळी नि फिरताना दिसत होती. तर काही उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. बाजारातील समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्या बरोबर बाजारात नवीन सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन हि देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीची निवडणुकीत हवा 
बाजार समितीची हि निवडनुक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे. यासाठी काँग्रेस ,राष्टवादी ,शिवसेना आणि शेकाप ने एक पॅनल तयार केले आहे .आणि या आघाडीला कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे. आता पर्यंत बाजार समिती वर राष्टवादी आणि काँग्रेस चे वर्चस्व राहिले आहे मात्र आत महाविकास आघाडी काय जादू करेल हे निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळणार आहे .मात्र सध्या तरी भाजप चे एक हि पॅनल या निवडणुकीत दिसत नसल्याने इथे फक्त महाविकास आघाडीची हवा दिसत आहे यासाठी महाविकास आघाडीच्या  उमेदवारांसाठी आघाडीचे आमदार हि निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बाजार समितीत आले होते.
आमदार संजय जगताप याणी हि आज भाजीपाला बाजारात येऊन उमेदवार के डी  मोरे यांचा प्रचार केला . यावेळी महाविकास आघाडीचे पॅनलचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Share: