मुंबई एपीएमसी भाजीपला बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी , गर्दी रोखण्यासाठी बाजारसमिती प्रशासन अपयश

23
0
Share:
-बाजार आवारात  450 गाड्याची आवक
-रात्री 12 पासून गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी
-मुंबई एपीएमसी भाजीपला बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी
-बाजारसमिती प्रशासन गर्दी रोखण्यासाठी अपयश
-बाजार आवारात  व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना भित्ती
नवी मुंबई:मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने  भाजी खरेदी विक्री साठी गर्दी , [ सोशल डीस्टँट ] सामाजिक अंतर न बाळगता  कोणतीही प्राथमिक काळजी न घेता  व्यापारी  व्यवहार करताना दिसून आले आहे त्यामुळे काही व्यापारी मध्ये भित्तीचा वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली.  सध्या अत्यावश्यक गोष्टी सोडून इतर वस्तूचे दुकान बंद आहेत. कोकण आयुक्त शिबाजीराव दौड याचा मध्यस्थीत बाजार सुरू करण्यात आली परंतु बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहून बाजार आवारात व्यापार करणाऱ्या काही व्यपाराला भित्ती वाटत आहेत सध्या नवी मुंबईत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले आहेत त्यासाठी महानगरपालिका आणि इतर प्रशासन जोरात कामाला लागले आहेत बाजार आवारात झालेल्या गर्दीला रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासन अपयश ठरले  असे दिसून येत आहेत.
काही  दिवसात बंदच्या नंतर बाजार आवारात आज 450 गाड्याची भाजीपाला  आवक झाली. बाजार समितीच्या आवारचा गेटवर  रात्री 12 पासून   खरेदी करणारे व्यापारी, किरकोळ खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते.
कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांनी केलेल्या मध्यस्थी नंतर मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील सर्व बाजार  सुरु करण्यास व्यापाऱ्यांनी आणि कामगार प्रतिनिधींनी सहमती दर्शवली होते.त्यामध्ये
भाजीपाला व दाना मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर परंतु  मार्केट सुरू झाल्यावर होणाऱ्या गर्दीमुळे आता व्यापाऱ्यांना भित्ती वाटत आहे।  कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केट च्या गेट वरच जाहीर सूचना चा फलक लावण्यात आला आहे।
या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार ,मापाडी व इतर सर्व घटकांनी आवक गेट वर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून सॅनिटायझर लाऊन मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा सदर सुचने चे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अस ठळक पणे नमूद करण्यात आले आहे।मार्केट च्या आत येणाऱ्या गाडी वर सोडियम हायड्रोक्लोर्यीड ची फवारणी केली जात होते मात्र रात्री 2 मध्ये सुरू होणाऱ्या या भाजीपला मार्केट च्या गेट बाहेर होणाऱ्या गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली  ह्या गर्दीवर नियंत्रण करण्याची गरज आहे नाहीतर बाजार आवारात एकाला कोरोना लागण झाली तर मोठ्या प्रमाणात पसरू शकते असे काही व्यापारी यांनी सांगितले।
नागरिकांना भाजीपाला आणि अन्न धान्य चा योग्य पुरवठा करण्यासाठी  बाजार समिती मधील बाजार सुरु करणे गरजेचेच आहे त्यामुले बाजार समिती प्रशासनाकडून गेली कित्येक दिवस व्यापारी बाजार समिती घटक आणि कामगार प्रतिनिधी पोलीस प्रशासन , रेशनींग अधिकारी यांची बैठक घेण्याचे काम सुरु होते मात्र बाजार सुरु करण्याबाबत या बैठकांमध्ये नेत्याच्या हालचाली केल्या जात नव्हत्या. त्यामुले अखेर कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांच्या अध्यक्षेतेखाली एक महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीलाही सर्व घटकांची उपस्थिती नंतर मार्केट सुरू करण्यात निर्णय घेण्यात आला होता।
Share: