मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये मास्क कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजुरांची मारहाण ,मारहाणीच्या दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद

30
0
Share:
नवी मुंबई-मुंबई एपीएमसी प्रशासनाकडून मार्केटमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे फळ मार्केटमधील H आणि M विंगमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सर्व नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. त्याच प्रत्यक्ष आज फळ मार्केटमध्ये पाहायला मिळाले आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजूर कामगारांकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज दुपारी १२:३० च्या सुमारास अशीच एक घटना समोर आली आहे. “मास्क घाला, मास्क घातल्याशिवाय मार्केटमध्ये प्रवेश नाही” असे म्हणणाऱ्या एपीएमसी फळ मार्केटमधील सुरक्षारक्षकाला व्यपारी यांनी परप्रांतीय मजूरच्या साह्यने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मास्क न घातलेल्या परप्रांतीय मजूर यांना ज्यावेळी  २ सुरक्षारक्षकांनी अडवल्याने व्यापारी यांनी सपोर्ट केला आणि तब्बल १० ते १५ परप्रांतीय कामगारांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्याची व्हिडिओ  सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये परप्रांतीयांचा एक गट हा सुरक्षारक्षकांना मारहाण करताना दिसत आहे.
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडूनच कोरोना संदर्भात कोणत्या प्रकारची काळजी न घेतली जात असल्याने तिथे काम करणारे परप्रांतीय कामगारही कोणत्या प्रकारची काळजी घेत नाहीत.  फळ मार्केटमधील H आणि M या दोन्ही विंगमध्ये काम करणाऱ्या मजुरांमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना तिथे सर्वात जास्त घडतात. परंतु या मारहाणीच्या घटनांनमध्ये प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्यांचाच जीव कधी कधी संकटात सापडतो.
धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्यांनी भाजीपाला आणि फळ बाजारातील त्यांच्या कार्यालयात आणि गाळ्यांमध्ये परप्रांतीय कामगारांना आश्रय दिला आहे. या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजार समितीचे कुठलेही ओळखपत्र नाही आणि ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करतात त्यांच्याकडे त्यांची नोंदही नाही. बिंधास्तपणे कामगार मार्केटमध्ये वास्तव्य करत असून मुक्तपणे फिरत आहेत. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये एकूण ९८५ व्यापारी आहेत. तसेच हे परप्रांतीय कामगार कमी मोबदल्यात काम करत असल्याने त्यांना या व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्याच्या वरच्या भागावर अनधिकृतपणे बांधकाम करून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसणाऱ्या परप्रांतीय कामगारांना राहण्यास परवानगी दिली आहे. या एकाच खोलीत एकूण ५ ते १० लोक एकत्र राहतात ना मास्क ना सोशल डिस्टनसिंग पालन करतात ज्यावेळी कारवाई केला जातो त्यावेळी 100 ते 200 कामगार मिळून विरोध करतात.
मुंबई एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांच्याकडून एपीएमसी मार्केटमध्ये मास्क न घालणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न केला असून फळ मार्केटमध्ये आतापर्यंत एकूण १५५० मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली असून २ लाख ४० हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
Share: