मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये इराणचा कांदा दाखल

20
0
Share:
कांद्याची भाव स्थिर आणि मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात आली असून,  600 टन कांद्याचे  जेएनपीटी बंदरात आले आहेत.
नवी मुंबई -पावसामुळे कांद्याच्या पिकाचे झालेले नुकसान आणि त्यामुळे बाजारात निर्माण झालेली कांद्याची टंचाई मुले दोन दिवसात कांद्याची भाव वाढ झाली आहे .दारात नियंत्रण करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी परदेशातून कांद्याची आयात सुरु केली आहे त्यामुळे आज मुंबई एपीएमसी मध्ये इराण मधून २५ टन कांद्याच्या एक कंटेनर आला आहे बाजारात इराण कांद्याची भाव ५० ते ६० रुपये भाव मिळाला आहे ,तर आपल्याकडील कांद्याना ६० ते ७५ रुपये किलो घाऊक बाजारात भाव मिळाले आहे .कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात  करण्यात आली असून,600 टन कांद्याचे  कंटेनर सध्या जेएनपीटी बंदरात आले आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या जवळ असलेल्या साठवणीतील केवळ २५ टक्के कांदा शिलक होता . त्यामुळे पावसाळ्यापासून कांद्याची कमतरता होती . कांद्याची कमतरता जाणवणार नाही अशी अशा शेतकरी आणि व्यापाऱयांना होती यावेळी पावसाने कहर करीत दसरा-दिवाळी सणात हजेरी काम सुरूच ठेवली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली कांद्याची पीक अनेक ठिकाणी पाण्याखाली गेले . कांद्याची बाजारात टंचाई आहे त्यामुळे परदेशातून कांद्याची आयात करावी लागली आहे .
परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. यापूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणाहून कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे परदेशातील कांदा कसा आहे, हे आता अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना कळून चुकले आहे.
परदेशातील कांद्याला आपल्या कांद्याची सर नाही. आपल्या कांद्यात असलेला तिखटपणा आणि चव अन्य ठिकाणच्या कांद्याला नाही. त्यामुळे इतर कुठल्याही ठिकाणांहून कांदे आले तरी त्यांना महाराष्ट्रातील कांद्याची सर येत नाही. त्यामुळे आपल्याकडील ग्राहकांना इतर ठिकाणचे कांदे पसंती देत नाहीत.
अशा परिस्थितीमुळे आत्ता आलेल्या या परदेशी कांद्यांना बाजारात उठाव दिसून येत आहे. आता आपल्याकडील चांगला कांदा 60 ते 75 रुपये किलोमध्ये मिळत आहे. तर, हा परदेशी कांदा 50 ते 60 रु. किलोने उपलब्ध आहे.
सोमबारी मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारात आपल्या कांद्याला 40 ते 75 रु. किलोचा दर मिळाला असून कांद्याच्या 100 गाड्यांची आवक झाली आहे.
Share: