मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये वाहतूक कोंडी, तर शौचालय व बाजार आवारात घाणीचे साम्राज्य; व्यापारी संघांनी दिले निवेदन

18
0
Share:

*अनलॉक-4 मुळे मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाड्याची आवक वाढली; दरदिवशी 400 ते 500 गाड्याची आवक

नवी मुंबई: एकीकडे नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मुंबई कृषी उपन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला गाड्याची आवक कमी प्रमाणात होत होती. पण आता अनलॉक-4 मुळे बाजारात गाड्याची आवक वाढली आहे.

आज भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 500 गाड्याची आवक झाली आहे. यामुळे मार्केटमध्ये तसेच बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. ग्राहक, व्यापारी, माथाडी कामगार यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीमुळे आज भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे आणि व्यापारी महासंघाने एकत्र येऊन आज एक मिटींग आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये व्यापाऱ्यांनी मागणी केली की, गाड्याची आवक आणि जावक करण्यासाठी जे एक गेट उघडे ठेवण्यात आले होते त्याऐवजी गाड्याची आवक आणि जावक करण्यासाठी दोन्ही गेट उघडा. यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होईल.

तसेच भाजीपाला मार्केट आवारात येणाऱ्या ग्राहक असो माथाडी कामगार असो यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सौचालयचा. मार्केटमध्ये सौचालय आहे मात्र, त्यामध्ये स्वछता नाही. दुसरीकडे बाजार आवारात साफ सफाई नसल्याने बाजार आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Share: