मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गेटपासून सुरू होतो भ्रष्टाचार, व्यापाऱ्यांनी केला एपीएमसी प्रशासनावर आरोप,’टोकण सिस्टम बंद करा’

28
0
Share:

दीपाली बोडवे,एपीएमसी न्युज. कॉम

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात अद्याप ही सावळा गोंधळ सुरु असून यामुळे, व्यापाऱ्यांना व्यापार करणे कठीण झाले आहे. बाजारात माल मागवण्यासाठी टोकनच्या नावावर घेतले जाणारे बेकायदेशीर शुल्क चोरी छुपे सुरू आहे. मात्र, आताही ठरविक व्यापाऱ्यांनाच हे टोकन दिले जात असून यात व्यापारी संघटनांचा हस्तक्षेप सुरूच आहे. त्यामुळे भाजीपाला व्यापारी त्रस्त तर एपीएमसीचे कर्मचारी व व्यापारी प्रतिनिधी मस्त दिसून येत आहे.बाजारात व्यापार कमी तर टोकनच्या नावाने दलालचा प्रमाण वाढले आहे या दलाल बाजार समितीचे निरीक्षक व विंगच्या संघटनांच्या प्रतिनिधीमुळे टोकणचा झोल सुरू आहे.याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

दरम्यान,भाजीपाला बाजाराच्या मुख्य गेटपासून 1 किमी पर्यंत गाड्याच्या रांगा असतात.टोकण नसलेल्या गाड्यांची साईटच्या रांग मधून प्रवेश होते.भाजीपाला भाव चांगला मिळावा, म्हणून त्यांना साईटमधून प्रवेश दिला जातो. टोकण नसणाऱ्या गाड्याच्या प्रवेशासाठी 3500 रुपये आकारले जातात.टोकण असणाऱ्यांची गाडी सोडण्यासाठी 500 ते 1000 रुपये घेतले जातात.संध्याकाळी 7 पासून तुर्भे परिसरात वाहतूक कोंडी सुरू होते.या कोंडीमुळे उपचारासाठी जाणाऱ्या व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला.भाजीपाला बाजाराच्या गेटपासून हा सगळा भ्रष्टाचार सुरू होतो.दोन महिन्यात मार्केटमध्ये 3 उपसचिव येऊन गेले मात्र टोकनच्या नावाने झोल करणाऱ्या या दलालांवर कारवाई करू शकले नाही जे कारवाई झाली त्याला लगेच बदल्या करण्यात आला .त्यामुळे भाजीपाला व्यापाऱ्यांवर रामभरोसे वर जगायची वेळ आली आहे.खालचे कर्मचारी भाजीपाला मार्केट चालवतात,कुठलाही अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या पुढे गेला की, त्यांची बदली करण्यात येत आहे त्यामुळे अधिकारी म्हणतात आम्हाला भाजीपाला मार्केट नको .

दुसरीकडे पाहायला गेले तर कोरोनाकाळात सगळ्यात जास्त फायदा भाजीपाला मार्केटच्या काही व्यापाऱ्यांना आणि त्याचे ठरावीक दलाल आणि एपीमसीच्या कर्मचाऱ्यांना झाला. टोकण झोलच्या बातम्या दाखवल्या नंतर प्रशासनाने 5 जणांची बदली केली मात्र गेटवरून आणून त्यांना कार्यलयात टाकण्यात आले.या पाच जणांनी कोरोनाकाळात सगळ्यात जास्त गाड्या आत सोडल्या आणि त्यामुळे बाजारात होणाऱ्या आवकांचे नुकसान झाले,याला जबाबदार कोण असेल ?हा प्रश्न उभा राहतोय.निलंबन करून त्याच्याकडून आवक आणि बाजार फी वसुली केली पाहिजे होती, मात्र त्यांना बदली करण्यात आली.या टोकणमुळे होणाऱ्या भ्रष्टाचारावर व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे,टोकण प्रणाली बंद केली पाहिजे असे एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


शिवाय दोन महिन्यांपासून रविवारी बाजार बंद असतानाही बाजारात मालाच्या गाड्या बाजारात सोडल्या जात आहेत. मात्र त्यासाठी प्रत्येक गाडीसाठी ५०० रु चे टोकन व्यापाऱ्याकडून वसूल केले जात होते. त्यामुळे बाजारातील काही व्यापारी या बेकायदेशीर वसुली ने त्रस्त झाले असून बाजार समितीने हे प्रकार जातीने लक्ष घालून थांबवावेत अशी मागणी करू लागले आहेत.
घाऊक भाजीपाला बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांच्या संख्येवर सध्या वाढ करण्यात आली आहे. त्या नुसार बाजारातील तीन विंग ला 250 च्या जागी आता 400 गाडयांना आत येण्याची परवानगी दिली जात आहे. रविवार बाजारातील साप्ताहिक सुट्टी पाहता , शनिवारी आणि सोमवारी जास्त गाड्या येत असल्याने या दोन दिवस 400 पेक्षा जास्त गाड्यांचे टोकन बाजार समितीच्या वतीने दिले जाते. बाजारातील तीन विंग मध्ये या टोकण चे समान वाटप केले जाते. मात्र हे वाटप करताना बाजार समितीच्या निरीक्षकान बरोबर त्या त्या विंग मधील व्यापाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी हि हजर असतात. आणि हे व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मर्जीतील व्यापाऱ्यांना आधी टोकनचे वाटप करत असल्याचं आरोप अनेक व्यापारी करत आहेत.
परवाना धारक ,त्या नांतर गाळा धारक आणि त्या नंतर बिगर गाळा धारक या नुसार हे वाटप होत असल्याने बिगर गाळा धारक व्यापाऱ्यांना टोकन मिळतच नसल्याची खंत या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना भाजीपाला मागवता येत नाही आणि व्यवसाय ही करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱयांची कोंडी होत असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले.कोरोनाच्या विळख्यात सापडून भाजीपाला बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचे निधन झाले आहे आणि त्यांची मुले चार महिने घरी बसल्यानंतर व्यवसाय सांभाळायला बाजारात आली आहेत. मात्र या प्रकाराबाबत तेही नाराजी व्यक्त करत आहेत.
या संदर्भात बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण याना विचारले असता त्यांनी सांगितले बाजार समितीतील कारभार सुरळीत आहे व्यापाऱ्यांना काही अडचणी नसल्याचेच सांगितले.

Share: