मुंबई Apmc भाजीपला मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने भाज्यांची दारात मोठा घसरण,बाजारात 70 टक्के माल शिलक!

21
0
Share:
नवी मुंबई : मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 600 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात मोठा प्रमाणात घसरण झालाआहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती वाचल्या होत्या, मागील आठवड्यात भाजीपला बाजारात  30 ते 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी,फ्लावर,कारली, टोमॅटो, दुधी,शिमला मिर्ची, लवंगी मिरची ,बांगी, काकडी बाजारात  5 ते 15 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे तसेच भिंडी 15 रुपये,30 रुपये जुडी बिकला जाणाऱ्या कोथंबीर 8 रुपये झाला आहे, मात्र किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 600 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच आहे. तर सध्या बाजारात फ्लॉवर 8 ते 10 रुपये, कोबी 8 ते 12 रुपये, मिरची 10 ते 15 रुपये, काकडी 6 ते 10 रुपये किलो विकली जात असून, टोमॅटो 15 ते 20 रुपये, वांगी 8 ते 10 रुपये तर कोथिंबीर 5 ते 10 रुपये, मेथी 5 ते 10 रुपये, पालक 5 ते 10 रुपये दराने विकली जात आहे.
*आवक वाढल्याने आणि छटपूजा मुळे मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने 75 टक्के भाजीपाला मार्केटमध्ये शिलक पडला आहे त्यामुळे व्यपारी आणि शेतकऱ्यांना मोठा नुकसान झाला आहे अशी माहिती भाजीपाला व्यापारी बबन झेंडे यांनी  दिली आहे
Share: