मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात  70  टक्यांनी घसरण

10
0
Share:

दिपाली बोडवे,एपीएमसीन्यु्ज.कॉम

नवी मुंबई : दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे.प्रत्येक ठिकाणी तुंबई तुंबई झाली आहे, पावस्यामुळे मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपालाची 70 टक्के घसरण झाली आहे तर बाजारात 50 टक्के माल शिलक आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 275 गाड्याची असून दरही 60 ते 70 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे 15 दिवसापासून महागड्या भाज्या खरेदी करणाऱ्यांना आता दिलासा मिळत आहे.साधारणपणे लोकडाऊन काळात बाजारात 300 गाड्याची आवक असतात आज एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये 275 गाड्याची आवक झाली असून बाजारात मोठ्या प्रमाणात भाव घसरण झाली आहे ,
दोन दिवसात कोबीचा भाव 3 रुपये किलो, पडवळ 8 रुपये किलो, भेंडी 10 रुपये किलो, फरशी 12 रुपये किलो, वांगी 5 रुपये किलो,दुधी 7 रुपये किलो हा रेट सध्या बाजारात विक्रीसाठी चालू आहे.व्यापारी रविंद्र जाधव यांनी सांगितले की, या दोन दिवसात आमचं खूप पटीने नुकसान झालं आहे.जवळजवळ 50% माल तसाच शिल्लक राहिला आहे.या वादळीपावसामुळे कोणी मार्केटमध्ये खरेदी करायला आलं नाही.आणि बाजारामध्ये 70%घसरण झाली आहे.30% माल असाच ठेवून कुसून जात आहे ,त्यामुळे माल फेकावा लागत आहे.या पावसामुळे एपीमसी भाजीपाला घाऊक मार्केटमध्ये देखील खूप नुकसान झाल्याचं .ग्राहक नसल्या कारणाने माल ठेवून ठेवून खराब होऊन फेकायला लागला आहे.

घाऊक बाजारातील किलोचे दर रुपयांत

लाल भोपळा 5 ते 7

भेंडी नं. 1- 15 ते 18

भेंडी नं. 2- 10 ते 12

फ्लॉवर 5 ते 8

कोबी 3 ते 5

दुधी भोपळा 7 ते 9

टोमॅटो 5 ते 10

वांगी 5 ते 7

तोंडली 8 ते 10

पडवळ 8 ते 10

ढोबळी मिरची 10 ते 15

कारली 8 ते 10

Share: