कर्नाळा बँकेत 1 हजार कोटींची घोटाळ्या प्रकरणी विवेक पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे किरीट सोमयांकडून मागणी

17
0
Share:
रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे करोडो रूपयांच्या ठेवी पणाला लागल्या आहेत
पनवेल:रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रूपयांचा घोटाळा माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी केला असून या प्रकरणी चौकशी करीत त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमयांनी केली आहे. आज नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची किरीट सोमयां , पनवेल भाजपा आमदार प्रशांत ठाकूर , उरण आमदार महेश बालदी यांनी भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कर्नाळा बॅंकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बॅंकेने आॅडीट केले असता करोडो रूपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले आहे. कर्नाळा बॅंकेत मोठ्या प्रमाणात बेनामी खातदारकांच्या नावाने खाते उघडून यात करोडो रूपयांची कर्जरूपी रक्कम देवून ती आपल्या मालकीच्या ट्रस्ट मध्ये विवेक पाटील यांनी वळती केली असल्याचे अहवालात समोर आले आहे.
विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली . या खात्यात 700 करोड रूपयांच्या वर रक्कम कर्जरूपी टाकण्यात आली. तिथून ती विवेक पाटीलांच्या मालकीचे असलेले कर्नाळा स्पोर्टस क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये या रकमा वळत्या करीत त्या हाडप करण्यात आली आहे. याबाबत त्वरीत ईडी मार्फत विवेक पाटील आणि कर्नाळा बॅकेच्या अधिकारी , संचालकांच्या चौकशा करावी. कर्नाळा नागरी सहकारी बॅंक डूबीत निघाली असून यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे करोडो रूपयांच्या ठेवी पणाला लागल्या आहेत. ईडीनी त्वरीत विवेक पाटील यांची संपत्ती जप्त करून खातेदारकांना पैसे परत द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
Share: