अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही- शरद पवार

19
0
Share:

अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही- शरद पवार

आज सकाळी अचानक अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयालाराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठिंबा दिला असल्याची चर्चा रंगली होती. परंतु शरद पवार यांनी स्वतः ट्विट करूनअजित पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. असे स्पष्ट करत हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षफोडाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण अजित पवार यांनी जे केलेत्याबद्दल अनभिज्ञ असल्याचेम्हटलेआहे. त्यांनी जे काही केलेते त्यांचेवैयक्तिक मत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या संमतीने कोणताही निर्णय घेत नाही. तरीही त्यांनी शरद पवार यांना कल्पना न देता सत्तेसाठीभाजपला साथ दिली आहे.

Share: