पुरुषांसाठी “नो टी-शर्ट, नो सर्व्हिस” तर महिलांसाठी “नो टी-शर्ट, फ्री बिअर; बारचालकाची अश्लील जाहिरात 

16
0
Share:
नवी मुंबई :लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स आणि बार हे जवळपास ८ महिने बंद होते. त्यामुळे त्यांचा व्यवसायदेखील मंदावला होता. मात्र आता हळूहळू सर्व काही सुरु होताना दिसत आहे. व्यवसाय वाढावा यासाठी नवी मुंबईतील एका बारने एक विचित्र आणि लोकांना आश्यर्य वाटेल अशी सूट दिली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र व अश्लील जाहिराती केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील एका बारमध्ये घडला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि व्ययवसाय वाढवण्यासाठी सध्या व्यावसायिक आणि व्यापारी हे कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमध्ये पुरुषांसाठी “नो टी-शर्ट, नो सर्व्हिस” तर महिलांसाठी “नो टी-शर्ट, फ्री बिअर” अशा अश्लील प्रकारची जाहिरात केली जात आहे. यासोबतच अल्कोहोल किल्स कोरोना अशी जाहिरात करत ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
Share: