बाजार समितीच्या अनधिकृत गाळे धारकांना नोटिसा,व्यापाऱ्यांचा समितीच्या सर्व्हेवरच आक्षेप

23
0
Share:

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्यावतीने फळे व भाजीपाला बाजारातील अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्या गाळेधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.बाजारसमितीच्या फळ व भाजीपाला बाजाराच्या कार्यालयाच्यावतीने याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला जात आहे.बाजारसमितीने केलेल्या अनधिकृत गाळयांच्या सर्व्हेवरच व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.यामुळे अयोग्य पद्धतीने व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच पाठीशी घातले जात असल्याचा
आरोप नवी मुंबई घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने केला जात आहे.शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी वर्षानुवर्षे मिळत नसल्याचे ही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.या बाबत चर्चेसाठी बाजारसमितीच्यावतीने बुधवारी व्यापाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली होती.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजीपाला व फळ बाजारात अनधिकृतपणे व्यापार करत आहेत. स्वतः व्यापार नकरता गाळे भाड्याने दिले जात आहेत,गाळे धारक परवान्यांचे नूतनीकरणच करत नाही आणि पोट भाडेकरू ठेवत असल्याचा आरोप सध्या व्यापाऱ्यांवर होत आहे.त्यामुळे याची चाचपणी करण्यासाठी बाजार समितीच्यावतीने सर्व्हे करण्यात आला आहे.या स्वरूपात अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्या ७०० गाळे धारकांना बाजारसमितीच्या वतीने नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.व्यापारी मात्र बाजार समितीचा सर्व्हे चुकीचा असल्याचे सांगत आहेत.याशिवाय बाजारसमितीची स्थापना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झाली आहे.भाजीपाला बाजारात सुमारे २०० तर फळबाजारातील १०० शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देणे बाकी आहे.कायद्यानुसार शेतकऱ्यांची थकबाकी सात दिवसांत मिळणे गरजेचे आहे परंतु वर्षानुवर्षे ही थकबाकी शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार संघाच्यावतीने केला जात आहे.

बाजारसमितीची आणि व्यापारी महासंघाची बैठक २१ तारखेला ठरली आहे.त्या बैठकीत आणि हे सगळे प्रश्न उपस्थित करणार आहोत.बाजारसमितीच्या भोंगळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित
करणार आहे.

श्यामराव मोहिते-पाटील,उपसचिव घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ

Share: