डिसेंबर पर्यंत कांद्याचे भाव शंभरी गाठण्याची शक्यता

10
0
Share:

डिसेंबर पर्यंत कांद्याचे भाव शंभरी गाठण्याची शक्यता.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या हंगामातील उन्हाळा कांद्याला 65 ते 70 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे कांद्याची आवक मोठया प्रमाणात घसरल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा अगदीं नगण्य स्वरूपात आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याला चांगलाच दर मिळत आहे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जुन्या कांद्याचे भाव65 ते 70 रुपये प्रति किलो तर नवीन कांद्याचे भाव 55 ते 60 रुपये प्रति किलो आहेत apmc मार्केट मध्ये जुना कांदा 65ते70 रुपये तर नवीन कांदा हा 55 ते 60 रुपये प्रति किलो भाव असताना बाहेर किरकोळ व्यापारी 80 ते 90 रुपये प्रति किलो विकत आहे त्यामुळे या वर्षी कांदा ग्राहकांना रडवणार तसेच त्याचा तोटाही ग्राहकांना सहन करावा लागत असल्यामुळे किरकोळ बाजारात वाढीव भाव करून विकणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी माहिती apmc मार्केट मधील व्यापारी मनोहर तोतलानी दिली आहे

अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाल्याने लाल कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव वाढले आहेत. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सव्वा 2लाख क्विंटल अवाक ही एका महिन्यात झाली होती, मात्र या वर्षी 75 टक्के आवक घटली, असून या वर्षी कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांदा शंभरी पर्यंत जाऊ शकतो. सद्या किरकोळ बाजारात 1 किलो कांदा हा 80 ते 90 रुपयांनी विकला जातो. कारण विक्रेता हा त्याला झालेला पूर्ण खर्च विचारात घेऊन मग तो कांदा विकतो. कांद्याची बाजार भाव वाढ ही डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यत राहू शकते अशी माहिती कांदा क्षेत्रातील व्यक्तींनी दिली आहे .

Share: