वाशी येथील कांदा बटाट्याच्या घाऊक बाजारात आज कांद्याची भाव 60 रुपये किलो

87
0
Share:

नवी मुंबई:वाशी येथील कांदा बटाट्याच्या घाऊक बाजारात आज कांद्याची आवक 60 गाड्या झाली असून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत ,मार्केटमध्ये जुना कांदा हा 55 ते 60 रुपये किलो तर नवीन कांद्याचा भाव हा 45 ते 50 रुपये किलो ने विकला जात आहे ,साधारणपणे मार्केटमध्ये 100 गाड्याची आवक असते, सद्या मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी परिस्थिती डिसेंबर पर्यंत राहणार आहे अशे घाऊक व्यापाऱ्याने सांगितले आहे।

मागणीत मोठी वाढ झाल्याने कांद्याचा दर सध्या प्रतिकिलो ५० रुपयांप्रर्यंत पोहोचला आहे. याउलट अपेक्षित आवक होत नसल्याने ही दरवाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे; तर दुसरीकडे बटाट्याची आवकही कमी होत असून, त्याच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चिनी लसणावर बंदी असूनही, मार्केटमध्ये काळा बाजार करून हा लसूण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात आलेला हा चिनी लसूण रातोरात संपविला गेल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.

क्मुबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांद्याची आवक केवळ ४९ गाड्या इतकी झाली. अपेक्षित आवक होत नसल्याने जुना कांदा ५०० रुपये प्रति दहा किलो; तर नवीन कांदा ४५० रुपये प्रति दहा किलो असा विकला गेला.

परिणामस्वरुप किरकोळ बाजारात कांद्याचा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय शुक्रवारी बटाट्याची आवक केवळ ३७ गाड्या इतकी झाली. त्यामुळे बाजारपेठेत बटाटा १६ ते २० रुपये दराने विकला जात आहे; तर लसणाच्या केवळ पाच गाड्या आवक झाल्याने त्याचाही भाव चांगलाच कडाडला आहे. घाऊक बाजारात लसूण सध्या ११० ते १६० रुपये दराने विकला जात आहे.

गैरमार्गाने आवक?
भारतात चिनी कांदा विक्रीस असूनही, २४ टन लसूण मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत तीन दिवसांपूर्वी विकण्यास आला होता. चिनी लसणावर बंदी असल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गंडांतर येऊ नये, म्हणून व्यापाऱ्यांनी चिनी लसूण १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला. त्यामुळे भारतीय लसणाच्या दरात घसरण झाली. अन्यथा भारतीय लसणाला २०० रुपये प्रतिकिलोपर्यंतचा दर मिळाला असता अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारपेठेत दररोज सरासरी १०० च्या आसपास गाड्या कांद्याची आवक होते. मात्र, शुक्रवारी कांद्याची अपेक्षित आवक झाली नाही. त्यातच मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा 60 रुपये किलो दराने विकला गेला. भविष्यात कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
– सुरेेेश  शििंदे , व्यापारी, कांदा-बटाटा मार्केट.

Share: