फळ बाजारातील बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामाला विरोध

5
0
Share:

फळ बाजारातील इमारतीच्या बांधकामाला विरोध

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून . या बाजारपेठ मध्ये अधिकारी व्यक्ती भेट देऊन जातात . तसेच या बाजारपेठे मध्ये मोठया प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते.ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे फळबाजारात उभारलेल्या बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामावर व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामामुळे हा स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे या इमारतीला नवी मुंबई पालिकेने भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांनी नवी मुंबई पालिका आयुक्त आणि नगर रचना विभागाकडे केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी मंत्रालयातही दिले आहे.
महानगरपालिका, apmc प्रशासनाणे जर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू ,उपोषण करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Share: