पनवेल महानगरपालिकाच्या वतीने बचतगट-व्यावसायिक मेळावा संपन्न

23
0
Share:

 

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बचतगट-व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आ.क्रां.वा.ब. फडके नाट्यगृह येथे केले होते. पनवेल महानगरपालिका परीसरातील सुमारे 450 नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी उपमहापौर विक्रांत पाटील, उपायुक्त जमीर लेंगरेकर व संजय शिंदे,सभापती संजय भोपी, सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी गलांडे, शहाजी भोसले, माजी सभापती लिना गरड  ,नगरसेविका कुसुम म्हात्रे, कुसुम पाटील, हेमलता म्हात्रे, व नगरसेवक डाॅ.अरूणकुमार भगत उपस्थित होते.

सकाळी 8.30 वाजता नोंदणी सुरू करण्यात आली. डाॅ.संतोष कामेरकर बिझनेस कोच यांनी व्यवसाय नेटवर्किंग कसे करावे याचे मार्गदर्शन केले. विनोद मेस्त्री यांनी व्यवसायाकरिता लाईफ स्किल्स सांगितले.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जे NULN CLC mobile app तयार झाले आहे त्याची माहिती प्रेझेंटेशन द्वारे सादर करण्यात आली. या व्यतिरिक्त DAY NULM ची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेमार्फत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत खालील घटकांवर काम करण्यात येत आहे.
1) सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी
2) कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता.
3) स्वयंरोजगार कार्यक्रम
4) फेरीवाल्यांना सहाय्य
5) शहरी बेघरांसाठी निवारा
आतापर्यत सदर अभियाना अंतर्गत पुढीलप्रमाणे घटकनिहाय काम करण्यात आले आहे.
अ) बचतगट स्थापना :
एकुण 108 बचतगट (दारिद्रय रेषेखालील) स्थापन केले आहेत. व 5 वस्तीस्तर संघ आणि 1 शहर स्तरसंघ स्थापन करण्यात आले आहे.
ब) कौशल्य प्रशिक्षणादवारे रोजगाराची निर्मिती :
या घटका अंतर्गत एकुण 1100 लाभार्थ्यानी विविध विषयांचे कौशल्य प्रशिक्षण पुर्ण केले आहे. व जवळ जवळ 560 लाभार्थ्यांना रोजगार मिळवुन दिला आहे.
क) स्वयंरोजगार कार्यक्रम :
या कार्यक्रमामध्ये एकुण 52 लाभार्थ्यांना वैयक्तीक कर्ज वितरीत केले आहे व 12 बचतगटांना कर्ज वितरीत केले आहे.
ड) फेरीवाल्यांना सहाय्य :
या घटकाअंतर्गत फेरीवाला समिती तयार करण्यात आली आहे. तसेच सर्व्हेक्षण करणेकरीता बाह्ययंत्रणेची नियुक्ती करून त्यांच्याबरोबर करारनामा केला आहे. दिनांक २०/११/२०१९ पासुन प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाला सुरुवात होणार आहे.
ई) नागरी बेघरांना निवारा :
या घटकाअंतर्गत सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात निवारा कार्यरत आहे व कायमस्वरूपी निवारा बांधणेकरीता जागा मिळणेबाबतची कार्यवाही चालु आहे.

Share: