वाशी खाडी पुलावरून फुले टाकताना महिला पडल्या पाण्यात ,पोलिसांनी वाचबले जीव

19
0
Share:

नवी मुंबई:वाशी खाडी पुलावरून फुले टाकताना चक्कर आल्याने एका ४५ वर्षीय महिला पाण्यात पडल्या होता या महिलेनं वाहतूक पोलीस आणि स्थानिक मच्चीमारने फिशिंग बोटाच्या मदतीने समुद्रात जाऊन पाण्यात बुडणाऱ्या महिलेला पाण्यातून वाचवून बोटीतून बाहेर आणले आणि त्या महिलेचा जीव वाचवू शकले .

वाशी खाडी पुलावरुन एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे असा पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाले होते त्यावरून वाशी पोलिस ठाणे बीट मार्शल-1 चे कर्मचारी, वाशी चेक पोस्ट वरील पोलीस उपनिरीक्षक गुरव व सागरी सुरक्षा शाखेचे कर्मचारी यांनी तत्परतेने वाशी गावच्या स्थानिक मच्छीमार व जीव रक्षक महेश सुतार यांचे फिशिंग बोटच्या मदतीने समुद्रात जाऊन पाण्यात बुडणाऱ्या महिलेस पाण्यात उडी मारुन महिलेस पाण्यातून वाचवून बोटीतून बाहेर आणले.सदर महिलेकडे चौकशी करता तिचे नाव हिराबेन लक्ष्मीदास कटरमल (भानुशाली) वय (45) , हिमालय सोसा. असल्फा, घाटकोपर आहे ,हिराबेन यांनी पोलिसांना सांगितले कि कोपऱखेरने येथे तिच्या मुलीला भेटण्यासाठी आली होती ,मुंबई मधून येताना वाशी खाडी पुलावरून फुले टाकताना चक्कर आल्याने पाण्यात पडल्याचे सांगितले.वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सदर महिलेचे नातेवाईक हिरज कानजी कटारमल (भानुशाली) ला बोलावले आणि बिचारपूस केल्याने त्यांनी सांगितले कोपरखैरणे येथे भेटण्यासाठी येत असल्याचे सांगितले होते . सदर महिलेची प्रकृती व्यवस्थित असून त्यांची वैद्यकीय तपासणी साठी मनपा वैद्यकीय रुग्णालय ऐरोली येथे पाठविण्यात आले आहे व सदर महिलेचे पती लक्ष्मीदास कानजी कटारमल व मुलगा जिग्नेश कटारमल यांचे हवाली करण्यात आले आहे. वाशी पोलीस तसेच सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि स्थानिक मच्छीमार यांनी तत्परतेने कारवाई केल्याने महीलेचा जीव वाचवू शकले.

Share: