महानगरपालिका निवडणुकीपूर्वी फोडाफोडीचे राजकारण,पोलीस वळाचा वापर करून भाजप नगर सेवकांवर दबाब आनला जातोय-प्रवीण दरेकर

10
0
Share:

नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,माजी खासदार संजीव नाईक,माजी महापौर सागर नाईक ,धमकी देण्यात आलेल्या दिघा येथील नगरसेवक राम आशिष यादव यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले . यावेळी त्यांनी नवी मुंबईत भाजप नगरसेवकांवर दहशत निर्माण केली जात असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात असल्याचं दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं.

शहरात भयाचं वातावरण आहे. येथील वातावरण गढूळ झालं आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. या अनुषंगाने पोलिसांनी पावलं उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलं.
यापूर्वी महाविकास आघाडी सरकार मध्ये दाखल झालेले 5 नगरसेवकवर असेच पद्धतीने वळ वापरण्यात आली असे माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे।

Share: