समृद्ध जास्वंद

26
0
Share:

जास्वंद… फक्त देवाला वाहण्यापुरताच याचा उपयोग होतो, असे नाही… तर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह, तणाव, तोंडाचा अल्सर, केसांचे गळणे, सर्दी–खोकला, त्वचाविकार अशा अनेक आजारातही फायदेशीर आहे.

> जास्वंदच्या पानांनी बनवलेला चहा कोलेस्ट्रोल कमी करण्यात मदत करतो. या फुलातील अँण्टीऑक्सीडंट गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. याकरिता जास्वंद फूल पाण्यात उकळवून पिणे फायदेशीर असते.

> मधुमेह असल्यास नियमित 20 ते 25 पानांचे सेवन केल्यास मधुमेह बरा व्हायला मदत होते. याकरिता जास्वंदाचे झाड घराजवळ पिंवा बगिच्यात लावू शकता.

> किडनीची समस्या असेल तर जास्वंदीच्या पानांचा चहा सेवन करा. यामुळे किडनी विकार दूर व्हायला मदत होते. शिवाय या चहाचा उपयोग ताणतणाव दूर होण्यासाठी होतो.

> जास्वंदाचं सरबत हृदय आणि मेंदूला शक्ती देते. ज्यांची स्मरणशक्ती कमी असेल त्यांनी त्यांनीही हे सरबत पिणे आवश्यक आहे. जास्वंदीची 10 पाने आणि 10 फुले घ्यावीत. ती सुकवून त्याची बारीक पावडर करावी. आणि एका एअर टाईट डब्यात ठेवावी. दिवसातून दोन वेळा दुधासोबत या पावडरीचे सेवन केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

> तोंडाचा अल्सर झाल्यास जास्वंदीची पाने चावावी.

> मेथीदाणे, जास्वंद व बोराची पाने वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे केसांना लावा. केसांची मुळे मजबूत होतील.

> जास्वंदामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्त्व सी असते. त्यामुळे त्याचा चहा प्याल्यास सर्दी-खोकला दूर होतो.

> जास्वंदाचे फूल केसगळतीची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे केसगळती थांबवण्यासोबतच केसांची वाढही होते. केसांमध्ये चमक निर्माण होते, केसांची मुळं मजबूत होतात. जास्वंदीची 6-7 पाने बारीक वाटावी. ही पेस्ट 3 तास केसांना लावावी. नंतर कोमट पाण्याने केस धुवावेत.

> जास्वंदीची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि खाज येत असलेल्या किंवा सूज आलेल्या भागात लावा. यामुळे लवकरच आराम मिळेल.

> ऑनिमियाचा त्रास असेल तर जास्वंदीच्या 40-50 कळ्या सुकवून, वाटून हवाबंद डब्यात ठेवा. रोज सकाळ-संध्याकाळ एक कप दुधात ही पावडर मिसळून एक महिना घेतल्यास शारीरिक क्षमता वाढते

Share: