Pune Corona:पुण्यात आरोग्य व्यवस्था पडतेय अपुरी,पुण्यातील पत्रकाराचा वेळेवर अँबुलन्स न मिळाल्याने मृत्यू.

17
0
Share:

पुण्यात आरोग्य व्यवस्था पडतेय अपुरी…पुण्यातील पत्रकाराचा वेळेवर अँबुलन्स न मिळाल्याने मृत्यू…

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच आज सकाळी 5 ला कोरोनामुळे निधन झालं.

धक्कादायक म्हणजे रायकर यांना वेळेवर अँबुलन्स नाही भेटली. त्यांची ऑक्सीजनची पातळी खूप खालावली होती. आणि ज्यावेळी अँबुलन्स उपलब्ध झाली तेव्हा खूप उशीर झालेला होता.

पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग यांच्या जाण्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली की, जीव गेला हे निश्चित दुःखदायक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितले आहे. पुण्यात लक्ष दिलं जातं आहे, पालकमंत्र्यांनीही लक्ष दिलं आहे. ग्रामीण भागात‌ कोरोना पसरत‌ आहे, हे खरे असले, तरी बेड‌ कमी पडत‌ असतील तरी ते वाढवण्याचा‌ प्रयत्न केला‌ जात आहे. विम्याची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

पांडुरंग रायकर यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भागातच अशी परिस्थिती असेल तर बाकी महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल याचा आपण विचार पण करू शकत नाही.

Share: