भाजीपाला बाजारात गाजराच्या नावावर बटाट्याची विक्री,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांचे व्यापारी वर्गाकडून उल्लंघन

6
0
Share:

*भाजीपाला बाजारात गाजराच्या नावावर बटाट्याची विक्री.
*कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांचे व्यापारी वर्गाकडून उल्लंघन.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांचं भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात उल्लंघन होतं अजून.भाजीपाला बाजारात भाजीपाल्या ऐवजी चक्क कांदा बटाटा लसुण यांची विक्री केली जातं आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार वाशी येथे विविध शेतीमालाची खरेदी विक्री करण्यासाठी अनेक बाजार आहेत, प्रत्येक बाजारात त्यांना नेमून दिलेल्या मालाची विक्री करणे आवश्यक आहे उदा.भाजीपाला बाजाराच्या आवारात फक्त भाजीपाल्याशी संबधीत शेतमालाची विक्री होणे गरजेचे आहे.मात्र काही वर्षांपासून प्रशासक व व्यापारी संगनमत करून भाजीपाला बाजाराच्या आवारात चक्क कांदा, लसूण, बटाटे व नारळ यांची विक्री करत असल्याचे दिसूूून येेेत आहे ,२४सप्टेंबर रोजी सकाळी ४च्या दरम्यान भाजीपाला बाजारात २५ टन बटाटा असलेली वाहन निदर्शनास अली.खरे पाहता संबधीत आर .जे-११जि व्ही-५०२२या क्रमांकाच्या वाहनात गाजर असल्याचे भासवून त्यातून बटाटे भरून आणले होते हे वाहन आग्रा येथून आणले गेले असल्याची माहिती वाहन चालकाने दिली होती, या घटनेची माहिती बाजारसमितीला मिळाली असता त्यांच्या माध्यमातून ३२ए अंतर्गत कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते मात्र त्यांनी तसे न करता जुजबी कारवाई करून दंड स्वरूपात रक्कम वसूल केली .खरे पाहता बाजार समितीच्या कायद्यानुसार बाजार शुल्काच्या तिप्पट रक्कम तसेच इतर खर्च व अशा प्रकारे चुकीची खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे होते मात्र बजारसमितीच्या माध्यमातून तशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलले नाही.
अशा प्रकारच्या गैरकारभारामुळे बाजार समितीच्या आवारात कार्यरत माथाडी, मापाडी व बाजारसमितीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. भाजीपाला व्यापारी गणेश कुमार कंपनी, गाळा क्रमांक डी-४९५ यांनी भाजीपाला बाजाराच्या इमारतीमध्ये बटाटा  मागवला होता. मात्र त्याठिकाणी लसूण, कांदा व नारळ विकला जात असल्याचे आढळून आले. अशा गैरप्रकारांना कुठेतरी चाप बसावा अशी मागणी माथाडी व मापाडी वर्गाकडून होत असून. बाजार समितीच्या माध्यमातून ठोस कारवाई होतं नसल्याने त्यांच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

Share: