संजय राऊत यांची घेतली शरद पवार, धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी भेट;

31
0
Share:

संजय राऊत यांची घेतली शरद पवार धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी भेट;

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार ,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या नेत्यांनी राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांचे भाऊ व आमदार सुनील राऊत हेही उपस्थित होते.संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात नुकतीच एन्जोप्लास्टी नावाची एक छोटी सर्जरी झाली आहे.कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट राऊतांच्या घरीच जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली यावेळी राऊत यांच्या आईचीे सुद्धा भेट घेत अनेक कौटुंबिक गप्पाही या नेत्यांनी केले असल्याचे सांगण्यात येते.राज्यात महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र या वर्षभरात राऊत यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा प्रकारची एकत्र भेट कधीही दिली नव्हती त्यामुळे तब्येतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, यांची ही भेट पहिली ठरली आहे.

Share: