मुंबई एपीएमसी मध्ये धक्कादायक प्रकार: नगर मधून आलेल्या शेतकऱ्यांची दोन टेम्पो हरभरा खराब झाली.

24
0
Share:

नवी मुंबई: दर वर्षी भोगीच्या कालावधीत भाज्यांना जास्त भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी या कालावधीत माल आणणे पसंत करीत असतात आज वाशी भाजीपाला घाऊक बाजारात नागरमधून प्रशांत गोडसे या शेतकरी यांनी दोन टेम्पो  हरभरा आणला होता पण बाजारात वाहतूक कोंडीमुळे त्यांची टेम्पो बाजारात उशिर आला ज्यामुळे हरभरा पूर्णपणे खराब झाले .

मकर संक्रांतीच्या सण मुळे सोमवारी  वाशी भाजीपाला घाऊक बाजारात 813 गाड्याची आवक झाली आहे.आवक वाढल्याने मार्केटमध्ये मध्ये वाहतूक मोठया प्रमाणात कोंडी झाली आहे. त्याच बरोबर मार्केटमध्ये अनधिकृत पणे व्यापार करणाऱ्या व्यापारी रस्त्यावर बिकल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने दिसून येत आहे,येणाऱ्या ग्राहकांना पॅसेज मध्ये जायचं रस्त्या नसल्याने ग्राहकांना त्रास होत आहे.बाजार समिती मध्ये असलेल्या सुरक्षा रक्षक व काही अधिकाऱ्याचा संगनमताने या पॅसेजवर अनधिकृत व्यापार करण्यात येत आहे अशी माहिती माथाडी कामगार यांनी दिली आहे।मकर संक्रांती मुळे भाजीपाला व फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे ,रस्त्यावर कॅरट आणि खाद्यपदार्थचा स्टॉल लागल्या मुळे येणाऱ्या गाडी आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे अनधिकृतपणे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण आणावी अशी माहिती ग्राहकांनी दिली आहे। नगर मधून आलेल्या शेतकरी च्या दोन टेम्पो हरभरा सडलेल्या मुळे मोठ्या नुकसान झली आहे या शेतकऱयांची झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार अशे प्रश्न शेतकरी गोडसे यांनी केली आहे

Share: