घणसोली सिम्प्लेक्स येथे सहा दुचाकी ,दोन रिक्षा जळून खाक झाल्या

:
घणसोली सिम्प्लेक्स येथे सहा दुचाकी ,दोन रिक्षा जळून खाक झाल्या.

घनसोली सिम्प्लेक्स येथे हनुमान सोसायटीच्या पार्किंगमध्ये सात गाड्या जळाल्याची घटना समोर आली असून . ही घटना सोमवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीत सहा दुचाकी आणि दोन रिक्षा जळून खाक झाल्या आहेत.

. मध्यारात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने या दुचाकी जाळून टाकल्या, दुचाक्यांना आग लागल्यामुळे इमारतीच्या पार्किंगमध्ये आगीचे लोळ दिसू लागल्यानंतर ही दुर्घटना नागरिकांच्या लक्षात आली. आरडाओरड करीत नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग पसरत त्याची झळ सहा दुचाकीं व दोन रिक्षाना लागल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. मात्र, त्याआधीच या गाड्या जळुन खाक झाल्या.

दोन अर्धवट जळालेल्या दुचाकी वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच रबाले पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करीत दुचाकी जाळनाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत याप्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

You may have missed