शेती उत्पादनात पेरणी घटली, आणि दर वाढले

Share:

गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता तर केवळ ५०० हेक्टरवर साेयाबीनची लागवड केली जात आहे. रबी हंगामात इतर सर्व पिकांना तिलांजली देत येथील शेतकरी आता मका पिकाकडे वळला असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी मक्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. एवढेच नाही तर आजपर्यंत ज्या शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात हाेते. त्या शेतीत आता मक्याची लागवड केली जात आहे. इतर कडधान्याच्या जमिनीतसुद्धा मका लावला जात आहे. मुरूमगाव, सावरगाव, मालेवाडा यासारख्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा मक्याची लागवड केली जात आहे.

तेलवर्गीय पिकांचे काही वर्षांआधी जिल्ह्यात बऱ्यापैकी उत्पादन घेतले जात हाेते. मात्र भाव पडल्याने शेतकऱ्यांना ताेटा हाेण्यास सुरुवात झाली. परिणामी या पिकांचे क्षेत्र घटले. पण आता तेलाची मागणी वाढली असल्याने तेलवर्गीय पिकांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पुन्हा वळण्यास त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडू शकते.

२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली.

 

Share: