लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी !बच्चू कडूं

25
0
Share:

लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी !बच्चू कडूं

लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी ! जय महाराष्ट्र’ असे टट्विट करत आमदार बच्चू कडू यांनी भाजपला फटकारले. आज शिवतीर्थावर महाविकासआघाडीचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रात्रीत अजित पवार यांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यात गोंधळ उडाला. राज्यपालांनी नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा दिला.

Share: