ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने 3 कोटी 26 लाख रुपये किमतीचे चरस सह ट्रक जप्त केला आहे

17
0
Share:

ठाणे :  चरस घेऊन जाणाऱ्या ट्रकला ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी खारेगाव टोल नाका येथे पकडले. या ट्रक मधून तस्करी होणारा 3 कोटी 26 लाख रुपये किमतीचे चरस पोलीस पथकाने ट्रकसह जप्त केला असून चालक व क्लिनर यांना अटक केली आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरून एका ट्रक मधून कळवा खारेगाव मार्गे मुंब्रा येथे मोठ्या प्रमाणात चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे  पथकाने खारेगाव टोल नाका परिसरात सापळा लावला. यावेळी एक संशयित ट्रक पथकाच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्यास अडवले व त्या ट्रकची कसून चौकशी केली. यावेळी या ट्रक मध्ये तब्बल 65 किलो 214 ग्रॅम वजनाचा चरस लपवलेल्या स्थितीत आढळून आला. ट्रक चालक व क्लिनर या दोघांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत तीन कोटी 26 लाख सात हजार रुपये इतकी असल्याची माहिती अमली विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Share: